
सिंधुदुर्ग : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मला अभिमान वाटत असून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच हजार वनराई बंधारे बांधून झालेले आहेत. नागरिकांनी प्रत्येकांनी आपल्या आपल्या गावाच्या स्तरावर एकत्र येऊन दहा हजारांच उद्दिष्ट ठेवले होते. त्यातील पन्नास टक्के भाग पुर्णत्वास आला असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली
ते म्हणाले, सिंधुदुर्गवासियांच अभिनंदन व आभार मानतो. सिंधुदुर्ग दुष्काळाच्या ट्रिगर वनमध्ये जाहीर झाला आणि आठी तालुका हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. त्यानंतर मी, जिल्हाधिकारी आणि पूर्ण प्रशासनान पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने परिस्थिती पाहिली. त्यानंतर आम्ही सिंधुदुर्गवासियांना आव्हान केलं. त्यानंतर प्रत्येकानी पुढे येऊन गावागावात गावाच्या स्तरावर वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हातात घेतली.
पाणीटंचाईची संकट आपल्यासमोर भविष्यामध्ये कधीच येता नये, विहिरी सुखता नये, ही परिस्थिती कधी आपल्याला अनुभवता येता कामा नये यासाठी आम्ही आवाहान केल. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अभिमान वाटतो की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच हजार वनराई बंधारे आज बांधून झालेले आहेत.
नागरिकांनी प्रत्येकानी आपल्या आपल्या गावाच्या स्तरावर एकत्र येऊन ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन वनराई बंधारे बांधण्याची मोहीम गावागावामध्ये राबवली. त्याच्यामुळे आपण दहा हजाराचे उद्दिष्ट वनराई बंधाऱ्याचं नजरेसमोर ठेवले असून त्याच्यातले ५० टक्क्यांपर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत. त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था, असंख्य सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला.
सगळ्यांनीच एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा एक कुटुंब म्हणून कुठल्याही पद्धतीचे राजकारण न आणता हा निर्धार केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये कधीच पाणीटंचाई आणि दुष्काळाची परिस्थिती आणून देणार नाही हा संकल्प आपला असून आपलं उद्दिष्ट १०,००० बंधाऱ्यांचं आहे. अशाच पद्धतीने मोहीम आपण सगळ्या जणांनी चालू ठेवावी. जेणेकरून भविष्यामध्ये किंबहुना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत कधीच दुष्काळाचा चटका लागता कामा नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली.










