LIVE UPDATES

रस्त्यावर सापडलेले ५० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम मालकाला परत

पोलीस शिपाई अनिल पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 04:50 PM
views 75  views
Mumbai Police Constable Anil Sudam Patil returns lost gold jewellery and cash to the rightful owner.

मुंबई : रस्त्यावर सापडलेल्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम स्वतःकडे न ठेवता ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन संबंधित मालकाला परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पायधुनी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अनिल सुदाम पाटील यांनी कर्तव्यनिष्ठेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

पोलीस अनिल सुदाम पाटील हे पायधुनी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना कालबादेवी रोड परिसरातील एका कपड्याच्या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला एक पिशवी पडलेली आढळून आली. त्यांनी ती पिशवी तपासून पाहिली असता, त्यामध्ये अंदाजे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन हजार रुपये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.

सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हाती लागल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता श्री. पाटील यांनी आपल्या प्रामाणिकपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी सदर मुद्देमाल एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात नेऊन तेथील ड्युटी ऑफिसर पीएसआय जगताप यांच्या ताब्यात सुपूर्द केला. त्यानंतर संबंधित मुद्देमालाच्या मालकाचा शोध घेऊन तो त्याच्या स्वाधीन करण्यात आला.

आजच्या काळात मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर त्यावरील मोह टाळून ती वस्तू योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हीच खऱ्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे. पोलीस शिपाई अनिल सुदाम पाटील यांनी आपल्या कृतीतून ही कसोटी यशस्वीपणे पार केली आहे.

त्यांची ही कामगिरी केवळ एका नागरिकाला त्याची हरवलेली संपत्ती परत मिळवून देणारी नसून, पोलीस दलाविषयी जनतेच्या मनात विश्वास, आदर आणि सुरक्षिततेची भावना दृढ करणारी आहे. त्यांच्या या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कामगिरीची दखल घेत पायधुनी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्यांच्या या कृतीतून पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, सचोटी आणि जनसेवेची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.


ताजी बातमी

View all

Accident News :कुडाळात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
kokan Railway : कोकण रेल्वेच्या संचालकपदी कविता सातवी
October 28, 2026
Vaibhavwadi Panchayat Samiti meeting where Devanand Palande raised questions about Ainari Gram Panchayat expenditure.
Vaibhavwadi News : ग्रामपंचायतींच्या कारभारात सावळागोंधळ
October 28, 2026
किनळेत बिबट्याचा रस्त्यावर मुक्त संचार
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

Devendra Fadnavis launches online application facility for 24 Maharashtra Fisheries Department schemes on MahaDBT 2.0.
Maharashtra Fisheries Schemes : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू
October 28, 2026
Sindhudurg Congress leaders congratulate MLA Satej alias Bंटी Patil on the Gokul Milk Union election victory.
Gokul Election : गोकुळ निवडणुकीतील विजयाबद्दल साक्षी वंजारी यांच्याकडून बंटी पाटील यांचे अभिनंदन
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
political news : विधान परिषद ,पदवीधर शिक्षक निकालाचे काय आहे चित्र ?
October 28, 2026
संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संवेदनशील पुढाकार
October 27, 2026