LIVE UPDATES

किनळेत बिबट्याचा रस्त्यावर मुक्त संचार

ग्रामस्थांमध्ये भीती, वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 05:51 PM
views 64  views

सावंतवाडी : किनळे परिसरात सध्या बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून रस्त्यावरच बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

किनळे गावातील अनेक नागरिक कामानिमित्त रात्री-अपरात्री दुचाकीवरून ये-जा करत असतात. अशा वेळी रस्त्यावरच बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांसह मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, बिबट्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर परिस्थितीची वनविभागाने तातडीने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किनळेचे सरपंच दीपक नाईक तसेच ग्रामस्थांनी केली आहे.