LIVE UPDATES

Gokul Election : गोकुळ निवडणुकीतील विजयाबद्दल साक्षी वंजारी यांच्याकडून बंटी पाटील यांचे अभिनंदन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 28, 2026 04:56 PM
views 53  views
Sindhudurg Congress leaders congratulate MLA Satej alias Bंटी Patil on the Gokul Milk Union election victory.

सिंधुदुर्ग :‌ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) या महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकार संस्थेच्या निवडणुकीत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. यासाठी सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आम. पाटील यांचे अभिनंदन केल्याचे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वावर जनता व दूध उत्पादक सभासदांनी पुन्हा एकदा मोहर उमटवली आहे. हा विजय म्हणजे विकासाच्या राजकारणाचा आणि जनविश्वासाचा विजय आहे असं साक्षी समीर वंजारी यांनी सांगितले. यावेळी ॲड. समीर वंजारी, प्रवीण केसरकर, अर्जुन पाटील, प्रमोद गायकवाड, राजू म्हामूलकर, बाबुराव ढवण, सारंग तळेकर, इंद्रनील मेंगाणे, रणजित पाटील आदी उपस्थित होते.