
प्रश्न : BSW(Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) ही व्यावसायिक पदवी धारण करणे कशासाठी आवश्यक आहे ?
उत्तर : विद्यार्थ्याना व्यावसायिक समाजकार्य शिक्षणामध्ये स्वयंसेवी समाजकार्य, गांधीवादी समाजकार्य आणि व्यावसायिक समाजकार्य यामधील फरक शिकविला जातो. समाजसेवा किंवा समाजकार्य पद्धतशीरपणे शिक्षण घेऊन, पारंगत होऊन, कौशल्याधारीत अशी द्यावयाची समाजसेवा म्हणजेच व्यावसायिक समाजसेवा किंवा व्यावसायिक समाजकार्य या दोन्ही गोष्टी कशापद्धतीने वेगवेगळ्या आहेत याचे शिक्षण BSW(Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work)या अभ्यासक्रमांमध्ये दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना या निरनिराळ्या सेवाकार्यांना किंवा समाजसेवेलाइतर सर्व व्यावसायिक सेवां कार्याप्रमाणेच त्यांनी व्यक्ती, गट आणि समूह किंवा समुदायाला दिलेल्या व्यावसायिक सेवेचा मोबदला म्हणजेच व्यावसायिक सेवाकिंवा व्यावसायिक समाजकार्याचा मोबदला त्यांच्या नोकरी, उद्योग, व्यवसाय या माध्यमातून किंवा स्वतःची संस्था काढून मिळविता येतो व त्यासाठी विद्यार्थ्याना योग्य शिक्षित, सक्षम, पारंगत व कुशल बनविण्याचे काम हे BSW आणि MSW सारखे अभ्यासक्रम करीत असतात.
आजच्या काळात शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षणाने रोजगार, व्यवसाय, कौशल्य आणि समाजसेवा यांचा मार्ग खुला करणे आवश्यक आहे. पारंपरिक BA, BCom, BSc अभ्यासक्रमांपेक्षा BSW (Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work) हे अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख, कौशल्याधारित आणि व्यावसायिकआहेत. हे अभ्यासक्रम ग्रामीण, आदिवासी, शहरी आणि निमशहरीसर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी उपलब्ध करून देतात.
प्रश्न : BSW(Bachelor of Social Work) आणि MSW (Master of Social Work)या अभ्यासक्रमामध्ये काही विषेशिकरणे/ स्पेशलायझेशन आहेत का ?
उत्तर :
शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदायविकास, वैद्यकीयवमानसोपचारसमाजकार्य, मानवसंसाधनव्यवस्थापन, कुटुंबवबालकल्याण, गुन्हेगारीवसुधारणाप्रशासन अशी विविध विषेशिकरणे/ स्पेशलायझेशन ही BSW / MSW या पदव्युत्तर पदवीअभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असतात. यापैकी शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदायविकास, वैद्यकीयवमानसोपचारसमाजकार्य ही दोन विषेशिकरणे / स्पेशलायझेशन ही रावेर, यावल , सातपुडा, धुळे, नंदुरबार, आणि नाशिक या ग्रामीण व आदिवासी पट्ट्यातील किंवा परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकास, हित व सोयीच्या दृष्टिकोनातून मुळजी जैठा महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
विद्यार्थ्याना मुळजी जैठा महाविद्यालय जळगाव याठिकाणी पुणे मुंबईच्या धरतीवर उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी अशा शिक्षक वर्गांकडून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा मानस हा संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकूमार बेंडाळे (दादा) यांचा आहे. BSW आणि MSW ही अभ्यासक्रम के नवीन सुसज्ज व प्रशस्त अशा इमारतीमध्ये यावर्षीपासून स्थलांतरित करण्यात आलेले असून विद्यार्थ्याना स्मार्ट बोर्ड, आधुनिक शिक्षण सामुग्री, पॉवर पॉइंट (पीपीटी) सादरीकरणे, वाय -फाय, प्रशस्त ग्रंथालय, कॉम्प्युटर लायब्ररी, प्रशस्त क्लासरुम, दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण, संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी संशोधनाला चालना, प्रात्यक्षिक कार्यासाठी विविध संस्थाबरोबर एम ओ यु करून तज्ञांकडून प्रात्यक्षिक कार्य अनुभव आदी नवीन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्याना सक्षम, कार्यक्षम, कुशल, व सर्वांगीण विकसित बनविण्यासाठीसंस्थेचे अध्यक्ष श्री नंदकूमार बेंडाळे (दादा) यांनी स्वतः लक्ष घालून आवश्यक अशा सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.आर्टिफिशियल इंटलीजन्स (ए आय) आधारित शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन हे देखील या अभ्यासक्रमाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे.
प्रश्न : BSWआणि MSW हे अभ्यासक्रम पारंपारिक किंवा परंपरा अभ्यासक्रमापासून कसे वेगळे आहेत?
उत्तर : मुळजी जैठा महाविद्यालय, जळगाव येथून बीएसडब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू हे दोन्ही अभ्यासक्रम व्यवसायाधारित शिक्षण इतर परंपरागत किंवा पारंपारिक असे बीए बीकॉम बीएससी किंवा इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत कौशल्याधारित, स्वतःचा उदरनिर्वाह करून, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक शिक्षण दिले गेल्यामुळे विद्यार्थी हे पारंगत होऊन नोकरी उद्योग व्यवसाय उद्योग धंदा उभे करू शकतात.
प्रश्न: BSWआणि MSW अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे आणि प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे?
उत्तर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एम एस डब्ल्यू हा अभ्यासक्रम तीन वर्षे किंवा चार वर्षांच्या पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षांचा किंवा एक वर्षाचा असा अभ्यासक्रम असणार आहे.
बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण (एचएससी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व तीन वर्षे किंवा चार वर्षाच्या डिग्री किंवा पदवीसाठी या अभ्यासक्रमास मुळजी जैठा महाविद्यालयामध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. तसेच काही ठिकाणी या अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रियेद्वारे देखील प्रवेश दिला जातोआणि दोन किंवा एक वर्ष अशी कालमर्यादा MSW या पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमासाठी असणार आहे..
प्रश्न : BSWआणि MSW अभ्यासक्रमामध्ये कोण कोणते विषय किंवा कौशल्याधारित घटकांचा समावेश असतो?
उत्तर : बीएसडब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने व्यावसायिक समाजकार्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात त्यामध्ये व्यक्ती कार्य, गटकार्य, समुदाय संघटन किंवा समूह कार्य, सामाजिक आणि समाजकार्य संशोधन, समाज कल्याण व्यवस्थापन आदी पद्धतींचा प्रामुख्याने समावेश असतो व याच पद्धतींच्या आधारे विविध संकटांचा सामना करण्यासाठी व्यक्ती, गट किंवा समूहाच्या समस्या समजून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्याच्या विविध पद्धतींचे शिक्षण व प्रत्यक्ष कार्य अनुभव हा व्यावसायिक समाज कार्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने दिला जातो.
प्रश्न : BSW किंवा MSWशिक्षणानंतर कोणकोणत्या नोकरी, उद्योग व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत?
उत्तर : समाजकार्य शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे त्यांच्या त्यांच्या विषेशीकरण किंवा स्पेशलायझेशन नुसार विविध क्षेत्रांमध्ये आपले भविष्य आजमावू शक्ततात. मुळजी जैठा तसेच इतर महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीयवमानसोपचारसमाजकार्य विषेशीकरण किंवा स्पेशलायझेशन समाजकार्य शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी हे राज्य किंवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये प्रामुख्याने मेडिकल सोशल वर्कर किंवा समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय), समाजसेवा अधीक्षक (मनोसामाजिक), समुपदेशक, समोपदेष्टा, समाज विकास अधिकारी, अववयदान समाज कार्यकर्ता/ समुपदेशक, बाल मार्गदर्शन केंद्रे, दत्तक केंद्रे येथे सामाजिक कार्यकर्ता, निरीक्षण ग्रह समाजसेवक, विशेष शाळांमधील समुपदेशक, शालेय समुपदेशक, मूल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समन्वयक, जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समुपदेशक, शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधील विविध पदे या पदांवर तसेच शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदायविकास विषेशीकरण किंवा स्पेशलायझेशनचे विद्यार्थी हे शासनाच्या ग्रामीण विकास विभागातील जल स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत मिशन, कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग इत्यादि ठिकाणी नोकरी मिळवू शकतात. त्याचबरोबर शासनाच्या समाज कल्याण विभागामध्ये समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, महानगरपालिका समाजसेवा अधीक्षक, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक, महिला व बालकल्याण अधिकारी, विविध कौटुंबिक समुपदेशन केंद्रांमधील समुपदेशक, विविध तुरुंग निरीक्षण ग्रह किंवा महिला केंद्रांमधील प्रोबेशन अधिकारी, आदी विविध पदांवर नोकरी मिळवून सरकारी नोकरीद्वारे सेवा देऊन शकतात.
शहरी, ग्रामीण व आदिवासी समुदाय विकास स्पेशलायझेशनमधून समाजकार्य शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी हे ग्रामीण विकास विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, ग्रामविकास कार्यक्रम, संसद आदर्श ग्राम योजना, स्वयंसेवी संस्था व राष्ट्रीय आयोग, चाइल्ड राइट्स, मुख्यमंत्री फेलोशिप, पाणी साठवण प्रकल्प, आदिवासी व समुदाय विकास कार्य, आदिवासी आश्रम शाळा या ठिकाणी विविध पदांवर नोकरी किंवा उद्योग करू शकतात.
निधी संकलक, निधी किंवा संसाधन संकलन अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, क्षेत्र अधिकारी, प्रकल्प समन्वयक, कार्यक्रम अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक, आश्रम शाळा अधीक्षक, संशोधन अधिकारी, संशोधन क्षेत्र अन्वेषक, संशोधन व दस्तऐवजीकरण अधिकारी आदी पदांवर देखील ही विद्यार्थी आपापल्या क्षमता, कुवत व कौशल्यानुसार कार्य करू शकतात तसेच विविध संस्था किंवा सीएसआर प्रकल्पांमध्ये देखील ते विविध भूमिका बजावू शकतात.
बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू. ची पदवी प्राप्त केल्यानंतर जर विद्यार्थ्यांनी मानव संसाधन स्पेशलायझेशनमधून समाजकार्य शिक्षण प्राप्त केलेले असेल तर त्यांना विविध कंपन्या, वर्कशॉप, सीएसआर कंपन्या किंवा सीएसआर विभाग, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, कंपन्या आरोग्य उद्योग संस्था, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ग्रामीण विकास विभाग किंवा सरकारच्या प्रमुख सार्वजनिक उपक्रम असलेल्या विविध पीएसयु किंवा पी एस ई मध्ये प्रशिक्षणार्थी एच आर, कामगार कल्याण अधिकारी, सहाय्यक एच आर, व्यवस्थापक, एच आर व्यवस्थापक, वरिष्ठ एचआर व्यवस्थापक, एच आर प्रमुख, कार्यकारी सहाय्यक, एच आर कार्यकारी, सी एस आर सहाय्यक, सीएसआर प्रशिक्षणार्थी, सीएसआर व्यवस्थापक, सीएसआर प्रमुख, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, व्यक्तिगत संबंध व्यवस्थापक, कामगार कल्याण अधिकारी, कल्याण अधिकारी, किंवा सार्वजनिक संबंध अधिकारी अशा विविध पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध असतात
महिला व बालकल्याण विभागाच्या स्पेशलायझेशनमधून समाजकार्य शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित संस्थांमध्ये कार्य करू शकतात.
कौटुंबिक समुपदेशन केंद्रे, कौटुंबिक नियोजन व लसीकरण सेवा, कौटुंबिक न्यायालय, जिल्हा महिला व वसतीग्रह, महिला कारागृह, वृद्धाश्रम, महिला सक्षमीकरण प्रकल्प, महिला भ्रूण हत्या प्रश्न आधारित प्रकल्प, लिंग संवेदनशीलता प्रश्न आधारित प्रकल्प, घरगुती हिंसा आधारित प्रकल्प, पॉश कायदा आधारित प्रकल्प, महिला आयोग, महिला हेल्पलाइन सेवा, बाल मार्गदर्शन केंद्रे, दत्तक केंद्रे येथे सामाजिककार्यकर्ता, निरीक्षण ग्रह समाजसेवक, विशेष शाळांमधील समुपदेशक, शालेय समुपदेशक, मूल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समन्वयक, जीवन कौशल्य शिक्षण कार्यक्रम आधारित समुपदेशक, शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी आदी ठिकाणी देखील विविध पदांवर व्यावसायिक समाज कार्य शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी नोकरी करून सेवा देऊ शकतात
प्रश्न : BSWआणि MSW समाजकार्य शिक्षणानंतर विद्यार्थ्याना उच्च शिक्षण, संशोधन किंवा इतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत ?
उत्तर : BSW किंवा MSW समाजकार्य शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण व संशोधन कार्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध असून नारी, एन आय आर आर एच,बार्टी , आर्टी, महाज्योती, यशदा, विविध शिक्षण संस्था, विविध संशोधन प्रकल्प, सी एस आर प्रकल्प, सर्वेक्षण व विश्लेषण विभागआदी विभागांमध्ये मूलभूत सर्वेक्षण, सामाजिक परिणाम अभ्यास, महामारी शास्त्रीय अभ्यास, मार्केट संशोधन, परिस्थिती विश्लेषण, संशोधन प्रकल्प आदी संशोधन कार्यांमध्ये फिल्ड ऑफिसर, फिल्ड इन्वेस्टीगेटर, संशोधन सहाय्यक, संशोधन सहयोगी, संशोधन अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन प्रकल्प प्रमुख, डेटा विश्लेषक, संशोधन व दस्तऐवजीकरण अधिकारी किंवा स्वतंत्र संशोधक म्हणून देखील विविध रोजगाराच्या संधि उपलब्ध असल्याचे दिसून येते.
प्रश्न: विद्यार्थ्यांना समाजकार्य शिक्षण घेण्यासाठी फी किती आहे ? राहण्यासाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे का ? आणि शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत का?
उत्तर : विद्यार्थ्यांना मूळजी जैठा महाविद्यालयामध्ये बी एस डब्ल्यू या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी अगदी माफक अशी फी आकारण्यात येत असून ती फक्त 6515 रुपये आहे तसेच एम एस डब्ल्यू या अभ्यासक्रमासाठी देखील 16310रुपये अशी अगदी माफक फी आकरण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना सुसज्ज असे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त नवीन होस्टेलची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अगदी माफक दरामध्ये निवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच बीएसडब्ल्यू व एम एस डब्ल्यू या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध असून शासनाच्या सर्व पद्धतीच्या शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विद्यार्थिनी शिष्यवृत्ती, स्वर्गीय अण्णासाहेब बेंडाळे शिष्यवृत्ती तसेच विविध खासगी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
प्रा चेतन दिवाण,
समन्वयक,
समाजकार्य विभाग व सामाजिक शास्त्रे,
खांदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जैठा महाविद्यालय, जळगाव.
मोबाईल- 09168941000/ 08605620556














