नागपूर : नागपूर येथे हिवाळीअधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनेक आमदार आपल्या आलिशान गाड्यांमधून ये जा करतात. तसेच आमदार निवास ते विधानभवन अशी एसटी ची व्यवस्था देखील आहे. जे काही मोजके आमदार या सेवेचा लाभ घेतात, त्या मध्ये शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी ह्यांचा समावेश आहे.
शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडे स्वतःचे वाहन आहे. परंतु ते राजापूर येथे. नागपूर येथे अधिवेशन काळात अनेकदा एसटी चा वापर करण्यात त्यांना अजिबात अवघडल्यासारखे वाटत नाही. या मध्ये अत्यंत साधेपणामुळे शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी आपले वेगळे पण सिद्ध केले आहे.