
फडणवीसांचीही X वर खास पोस्ट
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स (X) हँडलवरूनही मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!" अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.














