बीड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आता अधिक चिघळत चालले आहे. यात बीडमध्ये मराठा आंदोलक तरुण आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या कार्यालयासह घरावर मराठा आंदोलक तरुणांनी तुफान दगडफेक केली. तसेच घर आणि कार्यालयातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या देखील जाळल्या आहेत.