बारामतीत विमान अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

Edited by: संदीप देसाई
Published on: January 28, 2026 10:20 AM
views 3476  views

बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह असलेले विमान बारामती येथे लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना अपघातग्रस्त झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात अजित पवार यांसह विमानातील सहाही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

विमान लँडिंगच्या वेळी अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत स्पष्ट कारण समोर आलेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कोणते कारण यामागे असण्याची शक्यता असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र या भीषण अपघातात अजित पवार यांसह सहा जण मृत्यू पावले आहेत. ते बारामती येथे सभेसाठी निघाले असताना विमान लँडिंग वेळी हा अपघात झाल्याची माहिती पुढे आलीय.

या घटनेनंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.