KOKANSAAD LIVE | जगातल्या पहिल्या मालवणी न्युज बुलेटीनचं शानदार लॉंचिंग !

दर रविवारी आपल्या भेटीला येणार महाचॅनेलचं खास मालवणी न्यूज बुलेटीन !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 24, 2022 10:08 AM
views 338  views

सिंधुदुर्ग : आमचे जगभरातले कोकणवासीय ज्याची आतुरतेनं वाट पहात होते, त्या महाचॅनेलच्या मालवणी बुलेटीनचा आज शानदार शुभारंभ झाला. देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर आज महाचॅनेलनं हे अजुन एक ऐतिहासिक पाऊल पुढं टाकलं. सकाळपासुनच अवघ्या कोकणवासीयांचा या मालवणी बुलेटीनला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केबल टीव्ही चॅनेलवर आपल्याला हे बुलेटीन पाहता येईल. यानंतर दर रविवारी आमच्या जगभरातल्या कोकणवासीयांना हे खास मालवणी बुलेटीन पाहता येणार आहे.  


कोकणात सर्वप्रथम डिजिटल मिडीयात क्रांतीपर्व निर्माण करणा-या महाचॅनेलकडुन सातत्यानं जगभरातल्या दर्शकांची मालवणी बुलेटीनची मागणी होत होती. आजवर अनेक ऐतिहासिक उपक्रम यशस्वी केल्यानंतर मालवणी बुलेटीन हे आमच्या टीमसाठी आव्हानात्मक पाऊल होतं. मात्र त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून या मालवणी बुलेटीनचा प्रारंभ आज झाला. देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर हे बुलेटीन सकाळीच आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचलं. बुलेटीन पाहिल्यानंतर कोकणवासीयांना या बुलेटीनच्या माध्यमातंन आपले प्रश्न मांडण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ मिळाल्याच्या प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या. कोकणवासीयांनी मोठया उत्साहात या बुलेटीनचं स्वागत केलं. यापुढं दर रविवारी कोकणवासीयांच्या भेटीला हे खास मालवणी बुलेटीन येणार आहे. 


जगातलं पहिलं मालवणी न्यूज बुलेटीन पहा 

जगातला पयला मालवणी बुलेटीन | 'बातम्यो मालवणी' !

👇👇

https://youtu.be/TkoahGL51uw


नमस्कार गाववाल्यांनु...बोलणा-यानं बोलत रवाचा आणि आयकणा-यानं आयकत रवाचा अशी आमची मालवणी बोली. बोलण्यातलो गोडवो, लय आणि ठसको तेच्यामुळे येगळोच गोडवो आमच्या मालवणी भाषेक हा. मालवणी भाषेचो जगभरात डंको वाजलो तो मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी, रत्नागिरीचे लेखक प्रताप गंगावणे आणि कोकण कलाभूषण पंचरत्नांपैकी एक भजन सम्राट चंद्रकांत कदम हेंच्यामुळे. आता ह्याच ऐतिहासीक वाटचालीत मोठा योगदान देता ता कोकणचा नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE. आमी आता घेवंन येतो जगातला पयला मालवणी बुलेटीन 'बातम्यो मालवणी'. गावागावातल्या, वाडीवस्तीतल्या आणि जगाच्या कानाकोप-यात जगण्यासाठी संघर्ष करणा-या मालवणी माणसाचा ता ग्लोबल प्रतिबिंब असतला. आपले अडचणी, मागण्यो, प्रश्न मांडण्यासाठीचा ता मालवणी माणसांच्या हक्काचा व्यासपीठ असतला. कारण आमच्या दर्शकांकडसून बातमे मालवणीत सुरु करा अशी मागणी होय होती. तुमच्या पाठबळामुळं आमचा प्रत्येक पावल यशस्वी ठरला. ह्याय येळेक तुमची अशीच साथसोबत रवान्देत. ही हात जोडुन विनंती...देव दिवाळीचो मुहूर्त साधून आजपासून आम्ही सुरु करीत आसो जगातला पयला मालवणी बुलेटिन...'बातम्यो मालवणी ' !


पाहण्यासाठी क्लिक करा

👇👇

https://youtu.be/TkoahGL51uw

____

पहा केबल TV वर

👇👇

सावंतवाडी- चॅनेल नं.130, 867

मालवण- चॅनेल नं.48, 867,134

दोडामार्ग- चॅनेल नं.559

कुडाळ- चॅनेल नं.127, 867, 131

देवगड-  चॅनेल नं.133, 867

तळेरे- चॅनेल नं.130, 867

कणकवली- चॅनेल नं. 867

वेंगुर्ला- चॅनेल नं. 867

वैभववाडी- चॅनेल नं. 867

ओरोस- चॅनेल नं. 867

_____

Kokansaad Live News हे App  पुढील लिंकवर क्लिक करून इन्स्टॉल करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.sindhudurg.live.news

_____

मोबाईलवर लाईव्ह चॅनेल पाहण्यासाठी

https://bit.ly/3dezkbE

फेसबुक पेज लाईक करा

https://www.facebook.com/kokansaadlive

वेबपोर्टलला क्लिक करा

http://sindhudurglive.com  

ट्विटरवर फॉलो करा

https://twitter.com/kokansaadlive

इन्स्ट्राग्रामवर फॉलो करा

https://www.instagram.com/kokansaadlive

टेलेग्रामवर जॉइन व्हा

http://bit.ly/3cM2Eos

_____

जाहिरातीसाठी संपर्क

7720096041

9922928081

02363272191  

नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड

        कोकणसाद LIVE