'कोकणसाद LIVE' कोकणचा विश्वास ! पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोदगार ! महाचॅनेलच्या प्रधान कार्यालयाला दिली सदिच्छा भेट !

कोकणच्या विकासासाठी एकत्र काम करू : मंत्री रवींद्र चव्हाण
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 30, 2022 15:26 PM
views 415  views

सावंतवाडी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी कोकणचे नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' च्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. 'कोकणसाद LIVE'चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी 'कोकणसाद LIVE' च्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढत महाचॅनेलचे तोंड भरून कौतुक केले.


जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणचे नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' च्या कार्यालयाला आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'कोकणसाद LIVE' चॅनेल एक डिजीटल माध्यम म्हणून कोकणवासीयांसाठी, चाकरमान्यांसाठी सुरू केलेले पहिले क्रांतिकारी चॅनेल आहे. यादरम्यान या चॅनेलने अनेक अडचणींना सामोरे जात आपला यशस्वी प्रवास सुरु ठेवला असून महाचॅनेल अतिशय उत्तम कार्य करीत आहे. त्यासाठी माझ्या आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या या महाचॅनेलला मनापासून शुभेच्छा आहेत. भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दमदार मार्गदर्शनामुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम नेतृत्वाखाली डबल इंजीन सरकार स्थापन झालं असून सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील सर्व प्रश्न निकाली लावत आहेत. मी पालकमंत्री म्हणून इथल्या लोकप्रतिनिधींनी एकत्र घेऊन जिल्ह्याला आवश्यक आहे ते सर्व विकासाचे आणि रोजगार निर्मितीचे प्रयत्न करू. आपल्या जिल्ह्यातील स्थलांतरीत होणाऱ्या युवकांना रोजगार इथं उपलब्ध करून देत दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या जिल्ह्याला सुयोग्य दिशा देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.‌ त्यात चौथा स्तंभ असलेल्या  पत्रकारीतेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सकारात्मक विचार पोहचवायची ताकद तुमच्यात आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. इथं येण्याचा स्वार्थ हा एकच आहे, येथील जनतेशी थेट नाळ 'कोकणसाद LIVE' ची जुळलेली असून कोकणच्या विकासासाठी एकत्र काम करू, पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.


मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करीत 'कोकणसाद LIVE'च्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा प्रास्ताविकात मांडला. केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाचॅनेलने जपलेल्या सामाजिक बांधिलकीचा आढावा घेतला. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशाळेचे कौतुक करीत जिल्ह्यात आगामी काळात निश्चितच 'कोकणसाद LIVE'  विकासाच्या दृष्टिकोनातून सोबत असल्याची ग्वाही दिली. 


यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, राजन म्हापसेकर, अनिकेत पटवर्धन, दत्तू नार्वेकर, दिलीप भालेकर, गोविंद प्रभू आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार उपसंपादक प्रा. रुपेश पाटील यांनी मानले.