LIVE UPDATES

BREAKING | किरण सामंतांनी घेतल्या सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटी !

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 03, 2024 07:34 AM
views 1353  views

कणकवली : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. लोकसभेचे संभाव्य उमेदवार किरण उर्फ भैय्या सावंत हे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. मालवण भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर  कुडाळ मालवण कणकवली या तालुक्यातील  भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्याशी हितगुज देखील साधले. काही दिवसातच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी बाबत घोषणा होणार आहे.

 भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे येत आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण उर्फ भैया सामंत यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर असणारे किरण सामंत यांनी जिल्ह्यातील भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.