LIVE UPDATES

BREAKING | विनायक राऊत खासदार आहेत की नारायण राणेंच्या ऑफिसमधील चहा देणारा ऑफीसबाय !

आमदार नितेश राणे यांचं जोरदार प्रत्युत्तर
Edited by: भरत केसरकर
Published on: January 03, 2023 18:31 PM
views 543  views

देवगड : विनायक राऊत खासदार आहेत की नारायण राणेंच्या ऑफिसमधील चहा देणारा ऑफीसबाय, हे त्यांनी आधी जाहीर करावे, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. विजयदुर्ग किल्ल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, नारायण राणेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर कसे संबंध आहेत, याची चिंता संजय राऊत यांनी करू नये. पहिल्यांदा आपले संबंध उद्धव ठाकरेसोबत  चांगले ठेवा. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा विनायक राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी कधी, केव्हा आणी कसे प्रयत्न करत आहेत, हे जर मी सांगितल तर त्यांचे उरले सुरले कपडे राहणार नाहीत. त्यामुळे विनायक राऊत यांनी नरेंद्र मोदी, नारायण राणे ही मोठी नावे घेवू नये, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.