दादरमध्ये 'कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026'चे दिमाखदार उद्घाटन

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील हक्काच्या घरासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी; क्रेडाई सिंधुदुर्गचा स्तुत्य उपक्रम
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 04, 2026 21:37 PM
views 3331  views

मुंबई/कुडाळ : निसर्गरम्य कोकणात घर किंवा गुंतवणुकीचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी क्रेडाई सिंधुदुर्गने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. दादर येथील शिवाजी पार्क, क्रीडा भवन मैदान येथे “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” चे उद्घाटन आज क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्लजी तावरे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मुंबईच्या बाजारपेठेत मोठे व्यासपीठ मिळाले आहे.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य रसिकजी चौहान, उपाध्यक्ष विद्यानंदजी बेडेकर, खजिनदार सुरेंद्रजी भोईटे, सह-सचिव शहाजी पाटील आणि सह-खजिनदार दशरथजी शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच, आयोजक क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अभिजित जैतापकर, खजिनदार अनिल साखळकर यांच्यासह विजय प्रभू, पपू नाईक, अभय वालावलकर, विजय तेंडुलकर, ब्रिजेश कोठावळे, पपू पाटणकर, संकेत महाडिक, कुंदन केसरकर, उद्धव साखळकर यांसारखे अनेक नामवंत मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एकाच छताखाली शेकडो पर्याय- कोकणातील मालमत्ता खरेदीसाठी हे प्रदर्शन म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक मोठी पर्वणी ठरत आहे. या प्रदर्शनाचे 

नामांकित बिल्डर्स: २५ पेक्षा जास्त नामांकित विकासकांचा सहभाग.

प्रॉपर्टी व्हरायटी: १००० पेक्षा जास्त प्लॉट्स, २५० हून अधिक बंगलोज आणि ४०० हून अधिक N.A. (बिनशेती) प्लॉट्स.

व्यावसायिक संधी: गाळे (Shops) आणि ऑफिसेसचे विविध पर्याय उपलब्ध.

मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- मुंबईभर राबवण्यात आलेल्या व्यापक जाहिरात मोहिमेमुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केवळ घर खरेदीच नव्हे, तर गुंतवणुकीच्या दृष्टीनेही अनेक ग्राहकांनी प्रकल्पांची सखोल माहिती घेतली.

 "कोकणातील प्रॉपर्टीला मुंबईत थेट बाजारपेठ मिळावी हा आमचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे," असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

"कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात आपले घर असावे ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. हे प्रदर्शन त्या इच्छेला मूर्त रूप देण्यासाठी एक सक्षम दुवा ठरत आहे." असे मत गजानन कांदळगावकर (अध्यक्ष, क्रेडाई सिंधुदुर्ग) यांनी व्यक्त केले.

भेट देण्यासाठी माहिती:

येत्या दोन दिवसांतही हा प्रतिसाद वाढत जाईल अशी अपेक्षा आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

📍 स्थळ: क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (पश्चिम), मुंबई.

⏰ वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत.