
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) यांच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त “गोकुळ आयस्क्रीम” प्रकल्पाचा शुभारंभ तसेच 'गोकुळ श्री पुरस्कार' व 'विविध बक्षीस वितरण समारंभा'चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवारी १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता गोकुळ प्रकल्प, एम.आय.डी.सी., गोकुळ शिरगाव, कोल्हापूर येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे राहणार असून, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सतेज पाटील, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या वतीने २०२४–२५ या वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दूध उत्पादक संस्था, महिला दूध संस्था तसेच जास्त दूध पुरवठा करणाऱ्या शेतकरी व संस्थांना “गोकुळ श्री” पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले करणार असून अध्यक्षस्थानावर गोकुळचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने दूध उत्पादक, शेतकरी व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोकुळ दूध संघाच्या वतीने करण्यात आले आहे.














