LIVE UPDATES

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती

उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: November 10, 2026 10:06 AM
views 18  views

वेंगुर्ला: शहरातील दाभोसवाडा येथे दीपावली निमित्त शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या १८ फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनावरण करण्यात आले. वेंगुर्ला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते फीत कापून मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळा पार पडला.

शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दाभोसवाडा येथे साकारण्यात आलेली ही भव्य गणेशमूर्ती परिसरातील नागरिक आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशमूर्तीचे काम मूर्तिकार रोशन केळुसकर यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांतून १८ फुटी गणेशमूर्तीची संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, साई भोई, श्याम कुबल, मूर्तिकार रोशन केळुसकर, नगरसेवक सचिन शेट्ये, रवींद्र शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.

शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य बाळू लोणे, कामील फर्नांडिस, राजेश शेळके, कौस्तुभ आरोलकर, आग्नेल फर्नांडिस, पास्कल फर्नांडिस, विनोद आरोलकर, वेद फाटक यांनी विशेष सहभाग घेतला.

तसेच महिला सदस्य आयेशा हुले, स्वप्नाली बटवलकर, सई सातार्डेकर, वैदेही बटवलकर, सुप्रिया कोले, स्नेहल कोले, मयुरी आरोलकर, राधिका लोणे, सौ. शेळके यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.

दाभोसवाड्यात साकारण्यात आलेली ही १८ फुटी गणेशमूर्ती तुळशीविवाहापर्यंत दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील तसेच वेंगुर्ला शहरातील भाविकांना या भव्य गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. शौर्य प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामूहिक सहभाग आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले आहे.