
वेंगुर्ला : रेडी गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर राणे व मित्रमंडळ रेडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॉन-ट्रिक्सीन खुल्या नरकासुर स्पर्धेत शिवशक्ती मित्रमंडळ, आजगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत आजगावच्या मंडळाने आकर्षक सादरीकरणासह १० हजार २२० रुपये रोख व चषक असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेत तिरोडा येथील भवानी युवक मित्रमंडळाने ७ हजार २० रुपये व चषक मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर लहळेश्वर राऊळ मित्रमंडळ, रेडी-म्हारतळेवाडी यांनी ५ हजार २० रुपये व चषक मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये प्रत्येकी १ हजार २२० रुपये रोख अशी दोन पारितोषिके ब्राह्मण मित्रमंडळ, रेडी-म्हारतळेवाडी आणि सत्यपुरुष मित्रमंडळ, रेडी-बुडवाडी यांना देण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन रेडीचे सरपंच रामसिंग राणे व नमिता नागोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना मंगेश राणे, सदाशिव परब, सागर राणे व सिताराम राणे यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ दशावतारी कलाकार मंगेश राणे व गोवा-पाळये येथील ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव परब यांनी केले. यावेळी नामदेव राणे, निखिल राणे, वैभव राणे, त्र्यंबक आजगावकर, जयेश राणे, संदेश राणे आदींसह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच नरकासुर निर्मितीच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन मिळाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








