
सावंतवाडी : जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वीस दुकान गाळ्यांच्या भिंतींबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. संबंधित वीस दुकान गाळ्यांच्या भिंती काढण्यात आलेल्या आहेत. संजू परब यांनी त्यावर बोलताना तुमच्यात दम असेल तर भिंती घालून दाखवा असे आव्हान दिले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा होतो की, त्यांनाच संबंधित गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याची इच्छा नाही.संबंधित इमारतीचे २५ वर्षांपूर्वीच ऑडिट झाले असून, इमारतीला कोणताही धोका नसल्याची माहिती श्री.परब यांना होती असं मत शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांनी व्यक्त करत जनतेची दिशाभूल करू नका असा टोला भाजपला हाणला आहे.
ते म्हणाले, संजू परब यांनी पत्रकार परिषदेत वस्तुस्थिती मांडली होती. नगरपरिषद मासिक बैठकीमध्ये वीस दुकान गाळ्यांच्या भिंतींचा विषय नेमका कशासाठी उपस्थित करण्यात आला ? हा त्यांना सवाल होता. दुकान गाळ्यांच्या भिंती पुन्हा बांधण्याचा विषय संजू परब यांच्या मनात कधीच नव्हता. त्यामुळे या विषयावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करण्यापेक्षा आधी संपूर्ण वस्तुस्थिती समजून घ्या आणि मगच बोला. अशा प्रकारची वक्तव्ये आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाहीत असा टोला ॲड. भांबूरे यांना त्यांनी लगावला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








