LIVE UPDATES

'या' तारखेपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार..?

Edited by:
Published on: February 15, 2026 08:57 AM
views 511  views

मुंबई : राज्यातील शेती संकटावर दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल,अशी माहिती दिली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून, दीर्घकाळापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शेतकरी कर्जमाफीसाठी ३० जून ही अंतिम मुदत जाहीर केली होती. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले.