मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हवाई रुग्णवाहिकेची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत.
एकनाथ खडसे यांना उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये आणले जाणार असल्याची माहिती आहे. दुपारच्या सुमारास खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी हवाई रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.