
देवगड : ‘स्वामीराया’ या नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारकार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामीभक्तीची ओढ निर्माण होईल, असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे ‘स्वामीराया’ या मराठी नाटकाचा भक्तिप्रयोग सादर करण्यात आला. या भक्तिप्रयोगाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी स्वामींची आरतीही करण्यात आली. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी, “स्वामी कृपा कायम राहावी, या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांनी स्वामींच्या जीवनकार्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला आहे,” असे सांगितले.
याप्रसंगी अखिलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, आ. गणेश गाडगीळ, दिनकर तात्या पाटील, विजय पाटील, डॉ. रविंद्र पाटील, सुनील हुद्दरे बंधू, डॉ. राजू मलंग, प्रा. शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ. विश्व परतुरे, सौरेभ माणगावकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदी उपस्थित होते.














