LIVE UPDATES

कुणकेश्वरात चौथा श्रावणी सोमवार भक्तिभावात

मान्यवरांच्या हस्ते पहाटे श्रींची प्रथम पूजा
Edited by:
Published on: September 07, 2026 09:53 AM
views 88  views

देवगड : श्रावण मासातील अंतिम आणि पवित्र पर्वणीचा योग साधत आज चौथा श्रावणी सोमवार कुणकेश्वर मंदिर येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. पहाटे ५ वाजता श्रींच्या चरणी मान्यवरांच्या हस्ते विधिवत प्रथम पूजा संपन्न झाली.

या पूजेसाठी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD  शशिकांत शिंदे, भारतीय नौदलाचे अधिकारी मंगेश दळवी, प्रसिद्ध उद्योजक (कणकवली)  विशाल कामत तसेच देवगड येथील उद्योजक मंगेश वेतकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती संपन्न होऊन भाविकांसाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली.

चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी असेल, संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदात्यांनी या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी व्हावे आणि तीर्थक्षेत्री सेवा करण्याची सुवर्णसंधी साधावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली यांनी केले आहे.