
देवगड : देवगड तालुक्याच्या नजीकच्या दाभोळे गावात एप्रिल महिन्यापासून अगंणवाडी सेविका पद सेवा निवृत्तीमुळे रिक्त आहे. असे असताना महिला बालकल्याण विभाग देवगड कडून अदयापही या ठीकाणच्या रिक्त पदासाठी कोणतीही भरती प्रक्रीया राबवली गेली नसल्यामुळे प्रशासनाच्या अनास्थेबाबत प्रचंड नाराजी आहे.
दाभोळे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच भा.गो. पाटणकर यांच्या कारकिर्दीत दाभोळे गावात दाभोळे बौध्दवाडीसाठी पहिली अंगणवाडी मंजूर झाली. या अंगणवाडीत रूपाली चव्हाण यांनी गेली तीस वर्षे पेक्षा अधिक काळासाठी अंगणवाडी सेविका म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजाली.
नियत वयोमानानुसार माहे एप्रिल २०२६ रोजी त्या सेवा निवृत्त झाल्या. मात्र माहे एप्रिल २०२६ ते माहे सप्टेंबर पर्यंत अदयापही देवगड तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिका-यांकडून कोणतीही भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे दाभोळे बौध्दवाडीची अंगणवाडी सेविकेच्या प्रतिक्षेत आहे.
दाभोळे बौध्दवाडी अंगणवाडीच्या प्रविष्ठ मुलांची आभाळ होवू नये यासाठी अंगणवाडी सेविकेची भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यासाठी सरपंच श्रीकृष्ण अनभवणे व ग्रामस्थ विराज दाभोळकर यांनी लेखी निवेदन देवून प्रशासनाचे लक्षवेधले आहेत.











