
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून मुरबाड इथे जात असताना पुन्हा हेलिकॉप्टर जुहू विमानतळावरती आणण्यात आले आहे.
महालक्ष्मी रेस कोर्स इथून मुरबाड इथे त्यांचं हेलिकॉप्टर जात होतं. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला आणि त्यानंतर प्रिकॉशन म्हणून मुरबाड इथे जात असलेलं हे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा जुहू विमानतळावरती आणण्यात आलेल आहे. काही वेळापूर्वी कल्याण सह ठाण्यासह मुंबईमध्ये देखील अचानक एक वादळ आलं. धूळ मातीचा लोट अक्षरशः हवेमध्ये उडत होता आणि दृश्यमानता देखील कमी झाली होती. मात्र, त्याच वेळी महालक्ष्मी रेसकोर्स इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका हेलिकॉप्टरने उड्डान घेतली होती. ते एक मुरबाडला येथे एका लग्नासाठी जात होते. यावेळी अचानक मोठा वादळाचा झोत आल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर इमर्जन्स लँडिंग करावं लागलं.
हेलिकॉप्टर हवेत असताना पुन्हा त्याला माघारी फिरवून जवळ असलेल्या जुहूच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागल. या संपूर्ण प्रकारातून थोडक्यात एकनाथ शिंदे वाचलेले आहेत. सर्वजण अगदी सुरक्षित असून हेलिकॉप्टर विमानतळावर उतरवण्यात आलेल आहे.














