CM एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात !

असा आहे दौरा !
Edited by: ब्युरो
Published on: November 29, 2023 21:14 PM
views 455  views

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे गुरुवार  दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार दि. 30 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता  चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त  मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी 4 वाजता मोटोरीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 4.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. स्थळ:- चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग सायं. 5.15 वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय  विमानाने मुंबईकडे प्रयाण.