चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. यासाठी ते नियमित उपचार करीत होते. प्रकृतीत बिघाड झाल्याने शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. आज दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.