LIVE UPDATES

महाराष्ट्र-कर्नाटकातील दुष्काळाची केंद्राकडून पाहणी

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान येणार महाराष्ट्र दौर्‍यावर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 12:01 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पथके पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान महाराष्ट्राचा दौरा करणार असून, कर्नाटकातील पथक ३ ऑक्टोबरला दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. 

पाहणी अहवालानंतर आवश्यक मदतीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे चौहान यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धतेनुसार रब्बी हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील दोन तृतीयांश भाग दुष्काळाच्या सावटाखाली असून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. 

कर्नाटकातही दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे. केंद्र सरकार दोन्ही राज्यांच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून प्रत्यक्ष पाहणीच्या अहवालानंतर तातडीने आवश्यक ती पावले उचलली जातील असे विधान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे .