LIVE UPDATES

Regal ITI Students Industrial Visit : रिगल आयटीआयच्या विद्यार्थ्यांची कोका-कोला कंपनीला औद्योगिक भेट

सुरक्षा प्रशिक्षणातून मिळाले प्रत्यक्ष ज्ञान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 12:43 PM
views 39  views
Regal ITI Students Visit Coca-Cola Plant in Lote, Learn Industrial Safety

चिपळूण : कोंढे येथील रिगल आयटीआयच्या विद्यार्थ्यांना औ‌द्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी तसेच कार्यस्थळी सुरक्षिततेचे महत्त्व समजावे, या उ‌द्देशाने रिगल आयटीआयच्या विद्यार्थ्यांची हिंदुस्तान कोका-कोला बेवरेजेस प्राइवेट लिमिटेड, लोटे येथील कंपनीला औ‌द्योगिक भेट आयोजित करण्यात आली.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कंपनीतील विविध विभाग, उत्पादन प्रक्रिया, यंत्रसामग्रीचे कार्य तसेच औ‌द्योगिक क्षेत्रातील कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण (Safety Training) घेण्यात आले. कार्यस्थळी घ्यावयाची काळजी, सुरक्षा साधनांचा योग्य वापर, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना, अग्निसुरक्षा तसेच अपघात प्रतिबंध याबाबत वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कंपनीतील अधिकारी व तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत औ‌द्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले. या औ‌द्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळाला असून, भविष्यातील रोजगार व व्यावसायिक जीवनासाठी ही भेट उपयुक्त ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज व सुरक्षिततेचे महत्त्व समजले असून भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त अशी व्यावहारिक माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी रिगल आयटीआयचे प्राचार्य अभिराज कबीर, शिक्षकवृंद तसेच कोका-कोला कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.