LIVE UPDATES

BUDGET 2023 | शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 09, 2023 16:49 PM
views 468  views

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे.  त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, विरोधकांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला. शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.