सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघातील निवडणुकांची घोषणा झाली आहे. कोकणासह नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर विभागातील निवडणुकीची घोषणा झाली आहे. 5 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. तर 16 जानेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.