सिंधुदुर्गनगरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास भेट दिली. त्यांचे स्वागत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, बँक संचालक प्रकाश मोर्ये, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, सौ. नीता राणे, प्रभाकर सावंत, प्रदिप ढवण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँक अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे कौतुक केले.