LIVE UPDATES

5 हजार प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

भाजपचा उपक्रम ; विशाल परब यांची संकल्पना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 18:26 PM
views 21  views

सावंतवाडी : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील 5 हजार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून करण्यात आले. 

या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिक्षण, समाजकारण आणि गरजूंच्या मदतीसाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण सेवा भावाप्रमाणे भाजप युवा नेते विशाल परब यांनी हा उपक्रम राबविला आहे. ज्यांच्या हातात आज शैक्षणिक साहित्य पोहोचले, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांतील आनंद आणि प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच या कार्याचे खरे यश असल्याची भावना श्री. परब यांनी व्यक्त केली आहे. समाज बदलायचा असेल, तर सुरुवात शिक्षणापासूनच झाली पाहिजे, या विचारावर विश्वास ठेवून हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे.