LIVE UPDATES

मत्‍स्‍य व बंदर विभागात ९०० पदांची भरती

पालकमंत्री नीतेश राणेंची माहिती : रोजगार निर्मितीस माझे प्राधान्‍य
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 20:02 PM
views 209  views

कणकवली : माझ्‍याकडे असलेल्‍या मत्‍स्‍य व बंदर विभागात ९०० पदांची भरती करण्‍यात येत असल्‍याची माहिती पालकमंत्री नीतेश राणेंनी दिली.

प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी भाजप जिल्‍हाध्‍यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्‍हाध्‍यक्षा श्‍‍वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष संदीप मेस्‍त्री, माजी जि. प. अध्‍यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्‍य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्‍यक्ष मिलिंद मेस्‍त्री, शहराध्‍यक्ष अण्‍णा कोदे, पप्‍पू परब आदी उपस्‍थित होते.

मंत्री राणे म्‍हणाले, दोन्ही विभागात प्रत्‍येकी ४५० पदे भरण्‍यात येणार आहेत. त्‍यातील पहिला टप्‍पा जाहीर झाला असून तो २४० जागांचा आहे. रोजगार निर्माण करणे, हा माझा उद्‍देश आहे. तेच पाऊल माझ्‍या खात्‍याच्‍या माध्‍यमातून उचलले आहे, असेही राणे म्‍हणाले.