LIVE UPDATES

…तर अवेळी चेकपोस्‍ट गाठेन

पालकमंत्री नीतेश राणेंचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 25, 2026 19:53 PM
views 40  views

कणकवली : अलिकडेच गोमांस वाहन पकडले गेल्‍याबाबत विचारले असता राणे म्‍हणाले, हद्‍दीवरील दोन्‍ही चेकपोस्‍टवर तपासणी झाली नाही, म्‍हणूनच ते वाहन पुढे येऊ शकले. तेथे नेमके कोण अधिकारी, कर्मचारी होते, याची माहिती मी घेणार आहे. माझे बारीक लक्ष असून अवेळी चेकपोस्‍ट गाठेन, असा इशारा पालकमंत्री नीतेश राणेंनी दिला. पालकमंत्री राणेंची पत्रकार परिषद येथील प्रहार भवन येथे पार पडली. 

यावेळी भाजप जिल्‍हाध्‍यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्‍हाध्‍यक्षा श्‍‍वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष संदीप मेस्‍त्री, माजी जि. प. अध्‍यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्‍य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्‍यक्ष मिलिंद मेस्‍त्री, शहराध्‍यक्ष अण्‍णा कोदे, पप्‍पू परब आदी उपस्‍थित होते. गोमांस वाहतूक करणार्‍यांना कोण मदत करतात, याकडेही माझे लक्ष असून अवेळी चेकपोस्‍ट गाठेन असा इशारा त्यांनी यावेळी दिला.