
कणकवली : वाघाची भाषा करणारे आता झुरळापर्यंत आले आहेत. दुसर्यांच्या बारशामध्ये मिठाई खाण्याचे काम ते करत आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनात यांचे काय योगदान? यांची आंदोलने स्वत:च्या दोन मुलांसाठी असतात, अशी बोचरी टिका राणेंनी केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी केलेल्या वकत्व्याचा समाचार पालकमंत्री नीतेश राणेंनी प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत घेतला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जि. प. अध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पप्पू परब आदी उपस्थित होते.
ठाकरेंना अभिनंदन मोर्चा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या आंदोलनांमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्याही घोषणा दिल्या गेल्या. कुणाल कामरा याच्यासारखा हिंदू देवदेवतांचे अपमान करणारा देखील ठाकरेंच्या मोर्चात दिसला, असेही राणे म्हणाले.














