
सावंतवाडी : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व खासदार निलेश लंके यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांना वाढदिवसानिमित्त स्वतंत्र संदेश पाठवून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छापत्रात विशाल परब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभराट लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच खासदार निलेश लंके यांनी आयुष्यातील हा विशेष दिवस आनंद, उत्साह आणि समाधानाने भरलेला असो. त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळून प्रत्येक दिवस खास ठरो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्व स्तरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव श्री. परब यांच्यावर होत आहे.














