LIVE UPDATES

विलवडे-वाफोलीतील बेकायदेशीर दगडखाणी व क्रशर बंद करा

ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 06:06 PM
views 25  views

सावंतवाडी : तालुक्यातील विलवडे आणि वाफोली येथील बेकायदेशीर दगडखाणी व खडी क्रशर मशीन कायमस्वरूपी बंद करून, चुकीच्या पद्धतीने परवानग्या देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विलवडे ग्रामस्थांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खाणींना परवानगी नाकारली होती, त्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. मात्र, सावंतवाडीचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हास्तरीय बैठकीची मंजुरी नसताना तसेच बैठक झाली नसतानाही खाण मालकांना बेकायदेशीर परवानग्या दिल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तर गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, गावात यापुढे कोणत्याही नवीन दगडखाणीस परवानगी देऊ नये आणि सध्या झालेले धोकादायक खड्डे त्वरीत भरून घेतले जावेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसलेले क्रशर ताबडतोब बंद करण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्यात.

या निवेदनावर कृष्णा गुणाजी सावंत, आनंद लक्ष्मण दळवी, भालचंद्र अर्जुन गवस, सुधीर सखाराम सावंत, दत्ताराम महादेव सावंत, मनोहर गुणाजी सावंत, विठ्ठल दळवी, सुनील सुधाकर सावंत, विलास गणपत सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वेळेत योग्य ती प्रत्यक्ष कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


ताजी बातमी

View all

घर तेथे शोषखड्डा अभियानाचा देवगड तालुक्यात शुभारंभ
October 31, 2026
State Excise Department Officials Seize Goa-Made Liquor and Tempo Worth ₹55.50 Lakh at Zarap in Sindhudurg
Goa Liquor Seizure : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई
October 31, 2026
Fatal Dumper Accident on Mumbai Goa Highway Service Road at Tarele in Kankavli
Mumbai Goa Highway Accident : तळेरे येथे भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक
October 31, 2026
MP Narayan Rane Interacting with BJP Leaders and Workers at Party Office in Vengurla
Narayan Rane : खासदार नारायण राणेंनी साधला वेंगुर्ल्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

घर तेथे शोषखड्डा अभियानाचा देवगड तालुक्यात शुभारंभ
October 31, 2026
MP Narayan Rane Interacting with BJP Leaders and Workers at Party Office in Vengurla
Narayan Rane : खासदार नारायण राणेंनी साधला वेंगुर्ल्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद
October 31, 2026
Konkan Marathi Sahitya Sammelan 2026 : दुष्काळामुळे कोमसापचे १८ वे साहित्य संमेलन तात्पुरते पुढे ढकलले
October 31, 2026
मिठमुंबरी-बागवाडी प्रकरणी ३ नोव्हेंबरला ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा
October 31, 2026