
सावंतवाडी : तालुक्यातील समाजबांधव संजीव गणपत निपाणीकर यांच्या बाजारपेठेतील दुकानाला आग लागून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटाच्या काळात समाजाची बांधिलकी जपत, 'सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळच्या वतीने त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
दुकानाला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत, मंडळाचे सचिव जगदीश चव्हाण यांनी सर्व समाजबांधवांना श्री. निपाणीकर यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सावंतवाडी तालुक्यातील समाजबांधवांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. यामध्ये विशेषतः नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी १० हजार रुपये, विजय चव्हाण यांनी ५ हजार रुपये आणि रवीकिशोर चव्हाण यांनी ५ हजार रुपयांची भरघोस मदत केली. यासोबतच इतरही समाजबांधवांनी आपापल्या परीने आर्थिक योगदान दिले.
जमा झालेली एकूण ३३ हजार ५०० रुपयांची रक्कम श्री. निपाणीकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. या उपक्रमातून संघटनेने समाजातील एकता, बंधुभाव आणि आपुलकीचे दर्शन घडवून आणले आहे. या मदत वाटप प्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सिंधुदुर्ग चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी) चे अध्यक्ष विनायक चव्हाण, सचिव जगदीश चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सहसचिव बाबुराव चव्हाण, माजी अध्यक्ष गणेश म्हापणकर, दिलीप इन्सुलकर, विजय चव्हाण, मार्गदर्शक लक्ष्मण आरोसकर, रवीकिशोर चव्हाण, नरेश कारीवडेकर आणि दिनेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे इतर सभासद व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








