LIVE UPDATES

भडगावच्या उपसरपंचपदी प्रथमेश मोहिते

भाजप कार्यकर्त्यांकडून उत्साहात अभिनंदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 06:24 PM
views 69  views

कुडाळ : भडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे प्रथमेश प्रदीप मोहिते यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

यावेळी भडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी लोट, माजी उपसरपंच तथा माजी सरपंच राजू राणे, रवी सावंत, बूथ अध्यक्ष बाबू खरात, दया लोट, भाई लोट, श्रीनिवास नाईक, कृष्णा घाडी, श्री. बेलोसे, उल्हास लोट आणि विलास सावंत यांच्यासह अनेक मान्यवर, भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील विकासकामांना आणखी गती मिळेल, अशी दृढ अपेक्षा उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.