LIVE UPDATES

Project Sanjeevani : ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ

गावागावांत मिळणार मोफत रक्त तपासणीची सुविधा : मानव साधन विकास संस्थेचा अभिनव उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 07:02 PM
views 24  views
Project Sanjeevani In malvan

मालवण : ग्रामीण भागातील ग्रामस्थांना गावातच रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मानव साधन विकास संस्थेच्या वतीने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा अभिनव आरोग्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा उमा प्रभू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत सुसज्ज फिरते रक्त चिकित्सालय जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी मालवण तालुक्यातील हडी येथील आरोग्य उपकेंद्रात करण्यात आला. पहिल्या शिबिरात ५० जणांचे रक्त नमुने घेऊन त्यांचे अहवाल त्याच दिवशी सायंकाळी वितरित करण्यात आले.

ग्रामीण भागात रक्त तपासणीच्या सुविधा सहज उपलब्ध नसल्याने नागरिकांना तपासणीसाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते. यामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि अन्य अडचणींमुळे अनेकजण आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. ही समस्या लक्षात घेऊन संस्थेने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत कॉम्प्युटर यंत्रणेसह सुसज्ज पॅथॉलॉजी मोबाईल व्हॅन कार्यान्वित केली आहे. या फिरत्या रक्त चिकित्सालयाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गावातच विविध महत्त्वाच्या रक्त तपासण्या करून घेता येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत केवळ ५० रुपये नोंदणी शुल्क आकारून नागरिकांना चार प्रकारच्या महत्त्वाच्या रक्त तपासण्या मोफत करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये सीबीसी (हिमोग्लोबिन, लाल व पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स), रक्तातील साखरेची तपासणी, लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल व रक्तातील चरबीचे घटक) आणि सीरम क्रिएटिनिन (मूत्रपिंडाच्या कार्याशी संबंधित तपासणी) यांचा समावेश आहे. या तपासण्या प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय सावंत (एम.डी. पॅथॉलॉजी) यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली केल्या जाणार असून, तपासणीचे अहवाल त्याच दिवशी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हडी येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाला सरपंच प्रकाश तोंडवळकर, संजीवनी प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शक डॉ. संजय सावंत, मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर, माजी सरपंच महेश मांजरेकर, किशोर नरे, उमेश हडकर, दिनेश सुर्वे, कृष्णा वराडकर, महेश सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. रक्त तपासणी प्रक्रियेत तंत्रज्ञ प्राजक्ता माडये, सिद्धी परब, प्रगती नाईक आणि सुयोग पाताडे यांनी सहकार्य केले.

पहिल्या टप्प्यात ३० गावांचा समावेश

‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३० गावांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वर्षभरात प्रत्येक गावात पाच ते सहा वेळा रक्त तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र गाव समिती स्थापन केली जाईल. शिबिराची तारीख सात दिवस आधी कळविण्यात येणार असून, इच्छुक ५० नागरिकांची नोंदणी शिबिराच्या तीन दिवस आधीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.

मानव साधन विकास संस्थेच्या सामाजिक कार्यात आणखी एक भर

मानव साधन विकास संस्थेने यापूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उपजीविका वृद्धीसाठी ‘प्रोजेक्ट वृद्धी’, ‘प्रोजेक्ट सिंधुपुत्र’, शिलाई मशीन क्लस्टर, विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप, उद्योग करणाऱ्या महिलांसाठी इलेक्ट्रिक सायकल आणि शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल बँक यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच ‘मिशन व्हिजन’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे. आता ‘स्वास्थ्य हीच खरी संपत्ती’ हा विचार घेऊन संस्थेने आरोग्य क्षेत्रात ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेतला आहे.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर करीत आहेत. या प्रकल्पाबाबत अधिक माहितीसाठी ९४२११४६०६२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Abhishek Sharma celebrates his record-breaking century during India's third T20 International against New Zealand in Wellington.
अभिषेक शर्माची ११ षटकारांची बरसात; ख्रिस गेल अन् ॲरॉन फिंचचे विक्रम मोडले
October 27, 2026
संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संवेदनशील पुढाकार
October 27, 2026
Former MLA G.G. Uparkar and Shiv Sena Yuva Sena leader Sushant Naik meet traditional fishermen over the Mithmumbari-Bagwadi kayaking project dispute in Devgad.
Mithmumbari Jetty Dispute : मिठमुंबरीतील मच्छीमारांचा ‘जेलभरो’चा इशारा
October 27, 2026
Sanju Parab addresses villagers at Vazare village in Dodamarg over allegations of groundwater depletion and river drying linked to Vedanta Company's borewells.
वझरे गावाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Shiv Sena UBT leader Rupesh Raul and party representatives question the medical superintendent at Sawantwadi Sub-District Hospital over alleged patient care issues.
Sawantwadi News : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल
October 27, 2026
Maharashtra government decision on supernumerary posts for 14,747 eligible NHM contractual health workers
राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
October 27, 2026
Dr. Mariya Mohammad Afzal Shaikh's inspiring medical success story and her mother's sacrifice
Success Story : आईच्या अथक प्रयत्नातून लेकीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार
October 26, 2026
सावंतवाडीत योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न
October 25, 2026