LIVE UPDATES

Sawantwadi News : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल

रुपेश राऊळ आक्रमक : ठाकरे शिवसेनेचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 07:09 PM
views 48  views
Shiv Sena UBT leader Rupesh Raul and party representatives question the medical superintendent at Sawantwadi Sub-District Hospital over alleged patient care issues.

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली असून रुग्णालयातील सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील विकास बर्डे या युवकाला मारहाण झाल्यानंतर त्याच्या उपचारादरम्यान घडलेल्या प्रकारावरून ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एकचे डॉ. विशाल रेड्डी यांना जाब विचारत घेराव घातला. यापुढे अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ देणार नसल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.

यावेळी विकास बर्डे यांच्या पत्नी आणि नातेवाईक उपस्थित होते. तसेच जिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख राजू शेटकर, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, नगरसेवक देवा टेमकर, विभागप्रमुख विनोद काजरेकर, नामदेव नाईक, सुनील गावडे, उपविभागप्रमुख प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, संदीप गवस यांच्यासह तुळस गावातील ग्रामस्थ, रुग्ण आणि नातेवाईक उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Abhishek Sharma celebrates his record-breaking century during India's third T20 International against New Zealand in Wellington.
अभिषेक शर्माची ११ षटकारांची बरसात; ख्रिस गेल अन् ॲरॉन फिंचचे विक्रम मोडले
October 27, 2026
संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संवेदनशील पुढाकार
October 27, 2026
Former MLA G.G. Uparkar and Shiv Sena Yuva Sena leader Sushant Naik meet traditional fishermen over the Mithmumbari-Bagwadi kayaking project dispute in Devgad.
Mithmumbari Jetty Dispute : मिठमुंबरीतील मच्छीमारांचा ‘जेलभरो’चा इशारा
October 27, 2026
Sanju Parab addresses villagers at Vazare village in Dodamarg over allegations of groundwater depletion and river drying linked to Vedanta Company's borewells.
वझरे गावाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Project Sanjeevani In malvan
Project Sanjeevani : ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा शुभारंभ
October 27, 2026
Maharashtra government decision on supernumerary posts for 14,747 eligible NHM contractual health workers
राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
October 27, 2026
Dr. Mariya Mohammad Afzal Shaikh's inspiring medical success story and her mother's sacrifice
Success Story : आईच्या अथक प्रयत्नातून लेकीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार
October 26, 2026
सावंतवाडीत योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न
October 25, 2026