
देवगड : तालुक्यातील बागवाडी जेटी येथे कायाकिंग-बोटिंग व्यवसाय आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागाने अखेर जेटीवरील प्रवेश बंद करण्याची कारवाई केली आहे.मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जेटीवर प्रवेश करण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला. देवगडचे बंदर निरीक्षक मोल ताम्हणकर आणि सहाय्यक बंदर निरीक्षक सुभाष गुरव यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
कायाकिंग-बोटिंग प्रकल्प आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील वादामुळे बागवाडी जेटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने जेटीवरील प्रवेश बंद केल्याने या निर्णयाचा संबंधित व्यावसायिक आणि स्थानिक मच्छीमारांवर काय परिणाम होणार, तसेच या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या कारवाईच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांच्यासह पोलीस कर्मचारी आशिष कदम, अनिल कुमार पवार, मनोज राऊत आणि रवींद्र महाले उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








