LIVE UPDATES

अँड. संग्राम देसाई यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या खास शुभेच्छा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 10, 2026 21:32 PM
views 249  views

कुडाळ : अँडव्हकेट संग्राम देसाई यांच्यावर सध्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशानंतर त्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण उर्फ भैय्या सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.

विशेष म्हणजे, निवडणूक जिंकल्यानंतर अँड. संग्राम देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनीही रिप्लाय देत त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्गज नेत्यांचे आशीर्वाद आणि मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप मिळाल्याने देसाई यांच्या समर्थकांमध्ये सध्या मोठा उत्साह आहे.