LIVE UPDATES

देवगडात २९ जुलै रोजी 'वार्षिक शिवकालीन भावई उत्सव'

इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामतेचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 18:05 PM
views 15  views
#kokansadlive#news update#konkan update# Devgad News



देवगड : इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते यांच्या विद्यमानाने आणि समस्त मानकरी, देवसेवक व ग्रामस्थ कोटकामते यांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे वार्षिक शिवकालीन भावई उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक २९/०७/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

या उत्सवानिमित्त श्री देवी भगवतीच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवकालीन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद व उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त मानकरी, देवसेवक आणि ग्रामस्थ कोटकामते यांच्या वतीने करण्यात आले आहे.