
कणकवली : तालुक्यातील वारगावात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणि सरपंच नाना शेट्ये यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन व जीवनावश्यक वस्तुंच्या मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळजन्य परिस्थितीत सर्वसामान्यांना नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविल्याची माहिती सरपंच नाना शेटये यांनी दिली आहे.
वारगाव ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविका, आशा सेविका स्वयंसेविका यांनी एकत्रित येऊन प्राथमिक शाळेत सरस्वती पूजनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश उर्फ राजा जाधव,ग्राम विकास अधिकारी देवेंद्र नलावडे , शिक्षक वृंद ,ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचायत समिती सदस्य राजेश उर्फ राजा जाधव यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा, असे आवाहन करीत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या, असे आवाहन केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विजेत्यांना गावरान अंडी देणारी कोंबडी, खाद्यतेल, सुती विणलेल्या साडया, कपडी शर्ट अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका अर्चना तळगावकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








