
मुंबई : मागील आठ वर्षांपासून बेस्टमध्ये नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे 364 वाहकांची भरती करण्याचा बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतला आहे. वाहक या पदासाठी इच्छूक उमेदवारांना 29 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणार आहेत. बेस्टकडे सध्या 6, 402 वाहक कार्यरत आहेत. वाहकांची निवड ही कॉम्प्युटरवर आधारित चाचणीद्वारे केली जाईल. (BEST Mumbai Recruitment 2026)
बेस्ट प्रशासन 1,036 रिक्त पदांपैकी 364 म्हणजेच 35 टक्के पदे भरणार आहे. या पदांसाठी 1 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून 29 ऑगस्टपर्यंत इच्छूक उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. अर्ज करणारा उमेदवार हा इंग्रजी आणि मराठी विषय घेऊन 10 वीची परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तसेच या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 38 वर्षे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांची किमान 164 सेंमी उंची तर 45 किलो वजन असणे आवश्यक आहे.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान, उमेदवारांना 22 हजार 500 रुपये मूळ मासिक वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय आणि गणवेश भत्ता तसेच इतर लाभांसह मिळेल.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी पदभरतीची अधिकृत जाहिरात पहावी. अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
https://bestundertaking.com/assets/pdf/Recruitment-for-the-Conductor-position.pdf














