
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने टीसीएस (TCS) कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवक-युवतींना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने अर्ज स्विकारण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, इच्छुक उमेदवारांना आता २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये शासनाच्या निर्देशांनुसार ७० टक्के जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित ३० टक्के जागांसाठी इतर पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
राखीव जागांमुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ मिळणार आहे. तरी या मुदतवाढीचा लाभ घेऊन पात्र युवक-युवतींनी आपले अर्ज मुदतीत सादर करावेत, तसेच अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी बॅंकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










