LIVE UPDATES

Kotwal Recruitment Exam : कोतवाल परीक्षा १५ नोव्हेंबरला

४ नोव्हेंबर पासून मिळणार ओळखपत्र
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 04, 2026 12:21 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या महसूलसेवक (कोतवाल) पदांसाठी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तीनही उपविभागातील उमेदवारांसाठी लेखी परीक्षा रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. परीक्षेच्या ओळखपत्रांचे वितरण ४ नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.

प्रशासकीय सोयीसाठी व तांत्रिक सुलभतेसाठी तिन्ही उपविभागांमधील उमेदवारांची संयुक्त परीक्षा कुडाळ या मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही परीक्षा कुडाळ हायस्कूल आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल, कुडाळ येथे होणार आहे.

कणकवली उपविभागातील संबंधित उमेदवारांची ओळखपत्रे देवगड, कणकवली व वैभववाडी येथे त्या-त्या तहसील कार्यालयामार्फत ४ ते १० नोव्हेंबर या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत वितरित केली जाणार आहेत.

संबंधित उमेदवारांनी नोंद घेऊन वेळेत आपली ओळखपत्रे प्राप्त करून घ्यावीत आणि निर्धारित दिवशी व वेळी आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवे, असे आवाहन कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी केले आहे


ताजी बातमी

View all

Virat Kohli Rohit Sharma and Shubman Gill receive special All Blacks black jerseys from Keven Mealamu
ईडन पार्कवर भारतीय संघाच्या 'या' तिन्ही स्टार खेळाडूंचा सन्मान; रग्बी दिग्गजाकडून मिळाली खास 'ब्लॅक जर्सी' भेट
November 04, 2026
Careism Home Health Care 24 Hours Patient Caretaker Service in Sawantwadi Sindhudurg
Patient Caretaker Service in Sindhudurg : आता २४ तास घरपोच रुग्णसेवा उपलब्ध
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
आस्था लोंढेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
November 04, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : महागड्या कीटकनाशक ,फवारण्यांनंतरही अपेक्षित परिणाम नाही
November 04, 2026
संबंधित बातम्या

View all

AFMS Recruitment 2026 notification for 120 Short Service Commission medical officer vacancies for male and female doctors.
डॉक्टरांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी! एएफएमएसमध्ये १२० पदांची भरती
November 02, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Government Job : पन्नाशी ओलांडली तरी मिळेल सरकारी नोकरी
October 30, 2026
Supreme Court Recruitment 2026 for 20 Court Master Shorthand Posts
Job News : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! कोर्ट मास्टर पदाच्या २० जागांसाठी भरती
October 27, 2026
RRB Station Master Recruitment 2026 notification for 1,250 vacancies
रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२५० पदांसाठी भरती! २५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या पात्रता अन् पगार
October 26, 2026