LIVE UPDATES

शुक्रवारी ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका! रिलिज होणार 'हे' चित्रपट अन् वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी

OTT Releases This Week : या वीकेंडला नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी ५ आणि ॲपल टीव्हीवर काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलिज होत आहेत.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 12, 2026 05:33 PM
views 41  views
New OTT movies and web series releasing on Netflix, JioHotstar, ZEE5 and Apple TV on November 13, 2026

नवी दिल्ली : ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सस्पेन्स, क्राईम आणि थराराने भरलेले काही सिरिज तसेच चित्रपट प्रेक्षकांसाठी येत्या शुक्रवारी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी उपलब्ध होणार आहेत. जर तुम्ही या वीकेंडला काहीतरी रोमांचक आणि रहस्यमय पाहण्याचा विचार करत असाल तर नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, झी५ आणि ॲपल टीव्हीवर काही नवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलिज होत आहेत.  

यामध्ये स्टुडंट ऑफ द इयर: आफ्टर डार्क (Student Of The Year: After Dark) ही वेबसिरीज जिओ हॉटस्टार (JioHotstar) वर रिलिज होणार असून टीन मिस्ट्री, कॅम्पस थ्रिलरवर आधारित आहे.

हार्टलँड (Heartland) ही सिरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलिज होत असून मिस्ट्री थ्रिलर, क्राईम ड्रामावर आधारित आहे.

दायरा (Daayra) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix)वर रिलिज होणार असून क्राईम थ्रिलर, इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामावर चित्रपट आधारित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन आणि करीना कपूर खान आमनेसामने आहेत.

वांद्रे (Bandra) हा चित्रपट झी 5 (ZEE5) वर रिलिज होणार असून क्राईम ड्रामा, रिव्हेंज थ्रिलर, ॲक्शनवर हा चित्रपट आधारित आहे.

12 12 12 ही वेबसिरिज ऍप्पल टीव्हीवर रिलिज होत आहे. ही हेइस्ट थ्रिलर, क्राईम ॲक्शनवर आधारित आहे. ही सिरिज झुरिचमधील एका मोठ्या बँक दरोड्याभोवती फिरते. 

मर्डर इन गॅलिसिया ही सिरिज नेटफ्लिक्सवर रिलिज होणार असून क्राईम ड्रामा, मिस्ट्री थ्रिलरवर आधारित आहे. सत्य घटनांवर आधारित ही कथा एका रात्री एका महिलेवर झालेल्या हल्ल्यापासून सुरू होते. 

रणाबाली (Ranabaali) हा नाट्यमय चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix)वर रिलिज होत असून पिरियड ॲक्शन ड्रामा, ऐतिहासिक नाट्यावर आधारित आहे. राहुल सांकृत्यान दिग्दर्शित हा चित्रपट १८७० च्या दशकातील आहे. तेलुगूव्यतिरिक्त, हा चित्रपट हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही उपलब्ध असेल.

पारिवारिक मनोरंजन (Parivarik Manoranjan) हा चित्रपट सोनीलिव्ह (SonyLIV)वर रिलिज होणार आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी, फॅमिली ड्रामावर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे पंकज त्रिपाठी आणि अदिती राव हैदरी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येत आहेत. 


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Central Railway Apprentice recruitment 2026 : मध्य रेल्वेत 2861 अप्रेंटिस पदांची मेगा भरती
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Digital Life Certificate Campaign Sindhudurg : निवृत्तिवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड-जामसंडे रस्त्याच्या कामावर नगरसेवकाचा आक्षेप
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

Ranbir Kapoor in Ramayana movie, which sets a record at the UK and Ireland box office.
Ramayana Box Office Collection : रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा जागतिक बॉक्स ऑफिसवर डंका
November 11, 2026
Ranbir Kapoor as Lord Rama in Nitesh Tiwari's Ramayana movie.
रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्या दिवशीही कोटींची कमाई; जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन
November 06, 2026
Ayushmann Khurrana Radhika Apte and Tabu in Andhadhun crime thriller movie
ओटीटीवर पाहा आयुष्मान खुरानाचा जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट
November 04, 2026
OTT Releases This Week November 2 to 8 on Netflix JioHotstar ZEE5 and SonyLIV
नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, सोनीलिव्ह अन् झी 5 वर मनोरंजनाचा धमाका! २ ते ८ नोव्हेंबरदरम्यान रिलीज होणार चित्रपट, वेब सीरिज
November 02, 2026