LIVE UPDATES

Digital Life Certificate Campaign Sindhudurg : निवृत्तिवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे

सिंधुदुर्गात १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विशेष मेळावे ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 12, 2026 05:18 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सिंधुदुर्गनगरी : निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी निवृत्तिवेतन नियमित सुरू राहण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात सादर करावयाचा हयातीचा दाखला यंदा डिजिटल स्वरूपात सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. वित्त विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-५ राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कोषगार कार्यालय, सिंधुदुर्ग च्या च्या माध्यमातून देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५ संधर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा कोषगार अधिकारी करुणा हसबे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या,निवृत्तिवेतनधारकांना 'जीवन प्रमाण' या ॲपच्या माध्यमातून स्वतः डिजिटल जीवन प्रमाणपत्र (DLC) सादर करता येणार आहे. तसेच ज्या निवृत्तिवेतनधारकांना स्वतः ही प्रक्रिया करणे शक्य नाही, त्यांनी आपले निवृत्तिवेतन जमा होत असलेल्या बँकेच्या शाखेत, जिल्हा कोषागार कार्यालयात किंवा संबंधित उपकोषागार कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे. वितरण संस्था व कोषागार निवडताना 'महाराष्ट्र स्टेट ट्रेझरी' तसेच संबंधित कोषागार निवडताना 'सिंधुदुर्ग पीटीओ' म्हणजेच जिल्हा कोषागार कार्यालयाची योग्य निवड केल्याची खात्री करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय विशेष मेळाव्यांचे आयोजन

जिल्ह्यातील डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-५ शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी बँका, जिल्हा पेन्शनर संघटना, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयांच्या समन्वयातून विशेष मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

यामध्ये १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सावंतवाडी व कणकवली, १७ नोव्हेंबर रोजी मालवण व कुडाळ, १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला व देवगड, तर १९ नोव्हेंबर रोजी वैभववाडी व दोडामार्ग तालुक्यांतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये हे मेळावे होणार आहेत.

कोषागार कार्यालयातून निवृत्तिवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तिवेतनधारकांनी या मेळाव्यांना उपस्थित राहताना पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच आवश्यक संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अधिक मदत किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास जिल्हा कोषागार कार्यालय, संबंधित तालुक्यातील उपकोषागार कार्यालय किंवा आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.

शासनाच्या डिजिटल उपक्रमांना लोकसहभागातून व्यापक प्रतिसाद मिळावा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तिवेतनधारकांची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-५ शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व निवृत्तिवेतनधारकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Central Railway Apprentice recruitment 2026 : मध्य रेल्वेत 2861 अप्रेंटिस पदांची मेगा भरती
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड-जामसंडे रस्त्याच्या कामावर नगरसेवकाचा आक्षेप
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
Training aircraft skids off the runway at Solapur Airport during takeoff, woman trainee pilot safe
Solapur Airport Incident : सोलापूर विमानतळावर विमानाचा थरारक अपघात; उड्डाणादरम्यान प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर
November 12, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : देवगड-जामसंडे रस्त्याच्या कामावर नगरसेवकाचा आक्षेप
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad Rangoli Competition News : देवगडमध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा , प्रदर्शन
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
MLA Rohit Pawar : वटवृक्ष स्वामी देवस्थानाला आमदार रोहित पवारांची सदिच्छा भेट
November 12, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Devgad News : विश्वनाथ गिरकर यांचे निधन
November 12, 2026